Ramdas Athawale Photo Story : रामदास आठवलेंची पुन्हा शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा...

Deepak Kulkarni

जन्म :

रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील अगलगाव या गावातील एका गरीब कुटुंबात झाला.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

'आरपीआय'चे अध्यक्ष

आठवले हे मोदी सरकारमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आहेत.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

मोदी सरकारमध्ये मंत्री...

मोदी सरकारमध्ये ते सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आहेत. यापूर्वी ते पंढरपूरचे लोकसभेचे खासदार होते.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत, पण...

राज्यसभेच्या खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत आहे. पण, मला जर संधी मिळाली तर पुन्हा शिर्डीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं ते म्हणाले आहेत.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

शिर्डीत अधिवेशन..

शिर्डीत रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

शिर्डीतून लढलो पण हरलो...

काँग्रेस आघाडीमध्ये १९९८ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झालो. १९९९ मध्ये दुसऱ्यांदा झालो. २००४ मध्ये तिसऱ्यांदा खासदार झालो. चौथ्यांदा शिर्डीतून लढलो तेव्हा हरलो असंही ते म्हणाले.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

विखे पाटलांची अधिवेशनाला उपस्थिती

राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीतील रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) अधिवेशनाला उपस्थिती लावली.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

शिंदे - फडणवीसांशी चर्चा करणार...

उमेदवारीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही आठवले सांगितलं आहे.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

मोर्चेबांधणी सुरु

या शिबिराद्वारे रामदास आठवलेंनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचं बोललं जात आहे.

Ramdas Athawale Political Story | Sarkarnama

NEXT : जगभरातील विविध देशांच्या संसदभवन इमारती; फोटो पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल...

येथे क्लिक करा....