Rashmi Mane
राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यातील निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने लोकसभेआधीच राज्यांच्या प्रभारी पदाची घोषणा केली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा काँग्रेसचे नेते, माजी मंत्री रमेश चेन्निथला यांच्यावर सोपवण्यात आली होती.
केरळचे माजी विरोधी पक्षनेते आणि आक्रमक काँग्रेस नेते म्हणून रमेश चेन्निथला यांच्याकडे पाहिलं जातं.
तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी काम केलं असून गांधी घराण्याशी एकनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे.
चेन्निथला यांनी केरळ स्टुडंट युनियन मध्ये 1970 साली युनिट सेक्रेटरी पद भूषवीले पुढील दहा वर्षात त्यांनी थेट केरळ राज्य प्रेसिडंट पदापर्यंत बाजी मारली.
1982 मध्ये त्यांनी 'एनएसयुआय'चे नॅशनल प्रेसिडंट पद भुषविले होते. त्याच वर्षी ते केरळच्या हरिपद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.
वयाच्या 28 व्या वर्षी केरळचे सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांनी ग्रामविकास मंत्री पद सक्षमपणे सांभाळले. तब्बल 11 निवडणुका लढल्या आहेत.
1989 मध्ये कोट्टायम येथून ते खासदार झाले. त्यानंतर सलग चारदा खासदार होते. तर काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते सदस्यही आहेत.
हिंदी व इंग्रजीवर प्रभुत्व असणारे चेन्निथला यांनी केरळचे गृहमंत्री पद देखील भूषविले होते. ते केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. बॅचलर ऑफ आर्ट तसेच एलएलबीचेही शिक्षण त्यांनी घेतले आहे.