Rashmi Bagal : बलाढ्य मोहिते-पाटील गटाशी दोन हात करणाऱ्या रश्मी बागल...

Rashmi Mane

दिगंबरराव बागल यांच्या कन्या

रश्मी बागल या दिवंगत माजी मंत्री दिगंबरराव बागल यांच्या कन्या आहेत.

Rashmi Bagal | Sarkarnama

वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी

तत्कालीन राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांच्या अकाली निधनानंतर रश्मी बागल यांच्यावर बागल गटाची जबाबदारी महाविद्यालयीन वयात येऊन ठेपली.

Rashmi Bagal | Sarkarnama

आदिनाथ कारख्यान्यावर सत्ता

दिगंबरमामांच्या निधनानंतर लागलेल्या आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी बलाढ्य मोहिते पाटील गटाशी दोन हात करत सत्ता मिळवली होती.

Rashmi Bagal | Sarkarnama

संचालिका म्हणून काम

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

Rashmi Bagal | Sarkarnama

साखर कारखान्यांची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली

आदिनाथ आणि मकाई या साखर कारखान्यांचा कारभार त्यांनी पाहिला.

Rashmi Bagal | Sarkarnama

विजय कोलते यांच्या सूनबाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कोलते यांच्या त्या सूनबाई आहेत.

Rashmi Bagal | Sarkarnama

शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली

विधानसभेची 2019 ची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Rashmi Bagal | Sarkarnama

भाजपच्या वाटेवर

महाविकास आघाडीच्या काळात त्या राष्ट्रवादीच्या जवळ गेल्या होत्या. मात्र, राज्यात सत्ताबदल होतच त्या आणि अर्थातच बागल गट भाजपकडे झुकला आहे.

Rashmi Bagal | Sarkarnama

Next : मुख्यमंत्रीपदाची 'खुर्ची एक, उमेदवार अनेक'; चर्चा सर्वांचीच पण जनतेच्या मनात कोण?