Aslam Shanedivan
कधीकाळी हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी ओखळ असणारे रविंद्र चव्हाण आज भाजपमध्ये राज्यातील सर्वोच्च पदावर गेले आहेत.
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांची घोषणा भाजपचे नेते तथा केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी केली.
रविंद्र चव्हाण यांनी याआधी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, तसेच माजी कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज मुंबईत आयोजित एका भव्य कार्यक्रमात करण्यात आली.
रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 रोजी झालाय. त्यांची राजकीय कारकीर्द ही 2002 मध्ये भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुरू झाली.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून 2005 मध्ये ते निवडून आले तर 2007 मध्ये ते काँग्रेस राष्ट्रवादीची सत्तेत स्थायी समितीचे सभापती होते. ते रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते.
2009 मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांच्याजागी ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 मध्ये ते चौथ्यादा डोंबिवलीतून आमदार झाले
2015-16 मध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. ते ते रायगड, पालघर पालकमंत्रीही होते. तर 2021 मध्ये ते सिंधूदुर्गचे पालकमंत्री आणि पीडब्ल्यूडीचे कॅबिनेट मंत्री होते. तर आता ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष बनले आहेत.