Ravindra Dhangekar: धंगेकरांनी नावापुढे आईचे नाव लावत वेधून घेतले लक्ष

सरकारनामा ब्यूरो

पोटनिवडणुकीचे कसब्याचे विजयी आमदार रवींद्र धंगेकर यांचा आज विधिमंडळात शपथविधी पार पडला.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात त्यांनी आईचे नाव सुरुवातीला लावतं शपथ घेतली.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

"मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. तसेच मी 'रविंद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर' विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने " असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली. 

Ravindra Dhangekar | Sarkarnama

रवींद्र धंगेकरांनी या शपथविधी आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बंगळूरुमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 

Ravindra Dhangekar meet Congress president Mallikarjun Kharge | Sarkarnama

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मतोश्रीवर जाऊन भेट घेतली.

Ravindra Dhangekar meet Uaddhav Thackeray | Sarkarnama

"माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात ज्या शिवसेनेतून झाली आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून मला मिळालेला सन्मान लाख मोलाचा आहे." असे मत धंगेकरांनी यावेळी व्यक्त केले.

Ravindra Dhangekar meet Uaddhav Thackeray | Sarkarnama

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतले यावेळी शर्मिला ठाकरे यांनी धंगेकरांचे औक्षण केले.

Ravindra Dhangekar meet Raj Thackeray | Sarkarnama

"विधान सभेतील माझी कारकीर्द सुरू करण्यापूर्वी राजसाहेबांची झालेली भेट उर्जादायी अशीच होती." असे यावेळी धंगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar meet Raj Thackeray | Sarkarnama