Pradeep Pendhare
खात्यातून तुमच्या परवानगीशिवाय पैसे कापले गेले? घाबरू नका! RBIच्या नियमांनुसार काही प्रकरणांमध्ये ग्राहकाला शून्य किंवा मर्यादित आर्थिक जबाबदारी असते.
खात्यात अनधिकृत व्यवहार दिसताच बँकेच्या अधिकृत हेल्पलाइन, ॲप किंवा वेबसाइटवर तक्रार करावी. पुढील व्यवहार रोखण्यासाठी कार्ड किंवा संबंधित डिजिटल बँकिंग सुविधा ब्लॉक करा.
आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा. तसेच cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी.
बँकेचा तक्रार क्रमांक, SMS अलर्ट, ईमेल, बँक स्टेटमेंट आणि व्यवहाराचे स्क्रीनशॉट सुरक्षित ठेवा. तक्रारीची पोचपावती घेणे विसरू नका.
बँक किंवा ग्राहकाची चूक नसलेल्या तिसऱ्या पक्षाच्या फसवणुकीत बँकेचा संदेश मिळाल्यापासून 3 कामकाजाच्या दिवसांत तक्रार केल्यासही शून्य जबाबदारी राहते.
तिसऱ्या पक्षाच्या फसवणुकीत 4 ते 7 कामकाजाच्या दिवसांत तक्रार केल्यास नुकसान मर्यादित राहते. खात्याच्या प्रकारानुसार कमाल मर्यादा ₹5,000, ₹10,000 किंवा ₹25,000 पर्यंत नुकसान असू शकते.
OTP, PIN किंवा पासवर्ड शेअर केल्यामुळे फसवणूक झाली, तर बँकेला तक्रार करेपर्यंतचे संपूर्ण नुकसान ग्राहकाला सहन करावे लागू शकते. मात्र तक्रारीनंतर होणाऱ्या अतिरिक्त नुकसानीची जबाबदारी बँकेची असते.
शून्य किंवा मर्यादित दायित्वाच्या पात्र प्रकरणांत बँकेने तक्रारीनंतर 10 कामकाजाच्या दिवसांत तात्पुरती रक्कम खात्यात जमा करावी. अंतिम निर्णयासाठी कमाल 90 दिवसांची मुदत आहे.