Amit Ujagare
दिवाळीनिमित्त बाजारात खरेदी-विक्रीला उधाण आलेलं असतं. गेल्यावर्षी दिवाळीत ४.२५ लाख कोटींची विक्री झाली होती. त्यात यंदा २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यंदा सर्व क्षेत्रातील विक्रीचा आकडा हा ६.०५ लाख कोटी इतका झाला आहे. यामध्ये गैर कॉर्पोरेट आणि पारंपारिक बाजाराचा एकूण ८५ टक्के वाटा आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (कॅट) आपली रिसर्च शाखा कॅट रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीनं याबाबत देशभरात सर्वेक्षण केलं आहे. यामध्ये देशभरातील ६० प्रमुख वितरण केंद्रे ज्यामध्ये देशभरातील टिअर-२, टिअर-३ शहरांचा समावेश आहे.
आता कोणत्या क्षेत्रात किती विक्री झाली हे टक्केवारीत जाणून घेऊयात.
किराना-एफएमसीजी - १२, गृहसजावट - ५
सोने-चांदी - १०, फर्निशिंग-फर्निचर - ५
इलेट्रॉनिक्स - ८, मिठाई-५
कंझ्युमर ड्युरेबल्स - ७, पूजा सामग्री- ३
रेडिमेड कपडे - ७, फळं-मेवा- ३
भेटवस्तू - ७, इतर - २८