Akshay Sabale
दादाभाई नौरोजींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
दादाभाई नौरोजी यांचा जन्म मुंबईत 4 सप्टेंबर, 1825 रोजी झाला.‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ संस्थेच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय असल्याचं बोललं जातं.
‘ज्ञानप्रप्रसार सभा’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील पहिली कन्याशाळा सुरू केली.
‘रास्त गोफ्तार’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले. तसेच ‘बॉम्बे असोसिएशन’ संस्थेच्या स्थापनेतही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
1855 मध्ये इंग्लंडला गेल्यावर तिथे त्यांनी ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. भारतात परत आल्यानंतर 1875 मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य झाले.
1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी काम केले. काँग्रेसच्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय (हिंदी) सदस्य बनण्याचा मान त्यांनी मिळवला होता. तसेच रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सदस्य होण्याचा मानही त्यांनाच प्राप्त झाला होता.