Civilian Awards In India : भारतरत्न ते अशोकचक्र 'हे' भारतातील सर्वोच्च पुरस्कार

Roshan More

भारतरत्न

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. देशासाठी विज्ञान, साहित्य, कला, समाजसेवा आणि क्रिडा क्षेत्रात सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे.

Bharat Ratna | Sarkarnama

'पद्मविभूषण'

पद्म पुरस्कारमधील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तर देशातील दुसऱ्या क्रमांचा सर्वोच्च पुरस्कार आहे. विज्ञान, साहित्य, कला, समाजसेवा आणि क्रिडा अतुलनीय सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्काराची घोषणा केली जाते.

Padma Vibhushan | sarkarnama

'पद्मभूषण'

उल्लेखनिय सेवा देणाऱ्यांसाठी 'पद्मभूषण'हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो. या सन्मानामध्ये कांस्य बॅज दिला जातो. कमळाच्या फुलाच्या वर-खाली पद्मभूषण लिहिले असते.

Padma Bhushan | sarkarnama

'पद्मश्री पुरस्कार'

पद्मश्री पुरस्कार हा पद्म पुरस्कारांपैकी तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कला,साहित्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवन इत्यादी जीवनातील विविध क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

Padma Shri | sarkarnama

परमवीरचक्र

युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी भारताचा सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र आहे.

Param Vir Chakra

महावीरचक्र

परमवीर चक्रानंतरचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. सैनिकांना त्यांचा शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.मरणोत्तर देखील हा पुरस्कार देण्यात येतो.

Mahavir Chakra | sarkarnama

वीरचक्र

युद्धात साहस आणि पराक्रमाबद्दल सैनिकांना हा पुरस्कार देण्यात येतो.

Vir Chakra | sarkarnama

अशोकचक्र

हा शांततेच्या काळात दिला जाणारा शौर्य पुरस्कार आहे. हे युद्धात अतुलनीय शौर्य, साहस आणि बलिदानासाठी दिले जातो.

Ashoka Chakra | sarkarnama

NEXT : 2024च्या पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रात कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

Padma Awards | sarkarnama
येथे क्लिक करा