प्रसन्न जकाते
प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्याची दिल्लीतील तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी राहणार आहेत.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची ‘थीम’ विकसित भारत आहे. भारताने आता विश्वगुरू बनण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे.
कर्तव्यपथावरील पथसंचलन दरवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण असते. सुमारे 12 किलोमीटरचे अंतर जवानांना पार करावे लागते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तिकिटांची विक्री सध्या जोरात आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या समारोप प्रसंगी सादर होणारे ’बिटिंग द रिट्रीट’ जगाचे लक्ष वेधून घेते.
भारतीय प्रजासत्ताकाकडे कुणी डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही, अशा शक्तीशाली क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन कर्तव्यपथावर करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती आणि तीनही सेनादलाच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू या प्रजासत्ताक दिनी मुख्य ध्वजारोहण करीत सलामी स्वीकारणार आहेत.