Rashmi Mane
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए घटनास्थळाचा सतत तपास करत आहे.
वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी लोकांना मारले त्या ठिकाणाचे एनआयए थ्रीडी मॅपिंग करत आहे. हे 3D मॅपिंग तंत्रज्ञान काय आहे जाणून घ्या...
3 डी मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून, घटनास्थळाचे व्हिडिओ, छायाचित्रे, विधाने आणि उपग्रह प्रतिमा वापरून ग्राफिक्स तयार केले जातात.
दहशतवाद्यांच्या येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर गुन्ह्याच्या ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा अंदाज घेण्यासाठी डायमेंशन ग्राफिक्स उपयुक्त आहेत.
थ्रीडी मॅपिंगद्वारे थ्रीडी व्हिज्युअलायझेशन तयार करण्यासाठी फोटोग्रामेट्री, लिडार आणि ड्रोनचा वापर केला जातो. या तिघांचा डेटा एकत्र करून अचूक ग्राफिक्स तयार केले जातात.
2019 च्या पुलवामा हल्ल्यात आणि कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयातील बलात्कार प्रकरणात यापूर्वी ३डी मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.