Rashmi Mane
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पुण्यात आज (24 ऑक्टोबरला) सुरुवात झाली.
तरुणांना भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे ते नागपूर अशी 800 किलो मीटरची ही यात्रा असणार आहे.
आजपासून (24 ऑक्टोबर) 42 दिवस, 13 जिल्ह्यांमधून ही यात्रा प्रवास करणार आहे.
युवा संघर्ष यात्रेत रोहित पवारांची पत्नी आणि मुलेही सामील होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या यात्रेकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील युवकांच्या प्रश्नांबाबत रोहित पवार नेहमीच आक्रमक भूमिका मांडताना दिसतात.
राज्य सरकारने काढलेली कंत्राटी भरती, पेपरफुटी या प्रकरणांवरून रोहित पवारांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.
तरुणांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या पाहून या यात्रेचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ही यात्रा नागपुरात धडकणार आहे.