सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रवादी कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेला पुण्यातून सुरुवात केली.
युवा संघर्ष यात्रेत तरुणांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी लढण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना केली.
आज (25 ऑक्टोबर) पहाटे रोहित पवारांनी तुळापूर येथील संगमेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला.
तुळापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले.
रोहित पवारांना तरुणांनी आपल्या समस्या सांगितल्या.
शाळकरी मुलांसोबत गप्पा मारल्या व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या यात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रोहित पवारांनी तुळापूर येथील गावकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.