Rashmi Mane
लोकसभा निवडणुकांच्या चर्चा असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी महाराष्ट्रात आले.
या दौऱ्यात मोदींनी शिर्डीत श्री साईबाबांच्या भाविकांसाठी उभारलेल्या संकुलाचे उद्घाटन केले.
विशेष म्हणजे, या संकुलाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी यांनी २०१८ मध्ये शिर्डीत येऊन केली होती.
या संकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मोदी पुन्हा शिर्डीत आले.
तेव्हाच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या 'सीईओ' आणि आताच्या राज्याच्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संकुलाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले होते.
पंतप्रधान झाल्यानंतर मोदी हे गेल्या पाच वर्षांत (२०१८ ते २०२३) या कालावधीत दोन वेळा शिर्डीत आले.