नोकरीसाठी परदेशी जायचंय...चारित्र्य पडताळणीचे बदलले नियम!

Amit Ujagare

१) राज्यातील नागरिकांना खासगी नोकरी, परदेशी जाण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षक सेवा इत्यादी कामांसाठी चारित्य व पूर्वइतिहास पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असतं.

PCC

२) सध्या विविध पातळ्यांवर ही सेवा दिली जात असली तरी त्यात एकसमानता, टाईम लिमिट अन् पारदर्शकता यावी याची गरज शासनाला वाटली.

PCC

३) त्यानुसार, ही सेवा प्रभावी, पारदर्शक आणि वेळबद्ध पद्धतीनं प्रदान करण्यासाठी 'आपले सरकार' पोर्टलवर अर्ज प्रक्रिया अधिक सुकर व सुलभ करुन पुढील प्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे.

PCC

४) प्रस्तावाची पद्धत

खासगी नोकरी, परदेशी जाण्यासाठी, खासगी सुरक्षा रक्षक सेवा इत्यादी विविध कारणांसाठी अर्जदारानं चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज आपले सरकार पार्टलवरुन ऑनलाईन पद्धतीनं भरणे अनिवार्य राहील.

PCC

५) शुल्काची तरतूद

चारित्र्य व पूर्वइतिहास प्रमाणपत्रासाठी (PCC) शुल्क ऑनलाईन भरावं लागणार, त्यासाठी १) सामान्य PCC = 159 रुपये, २) सुरक्षा रक्षक PCC = 259 रुपये, ३) परदेशी जाण्याकरिता PCC = २५९ रुपये. शुल्क आकारलं जाईल.

PCC

६) आवश्यक कागदपत्रे

आपले सरकार पोर्टलवर यासाठी जी कागदपत्रे सांगितली आहेत ती अपलोड करावी लागणार. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यानं हा अर्ज ऑनलाईन प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी करावी. अर्जाचा उद्देश स्पष्टपणे नमूद करावा लागणार.

PCC

७) पडताळणी प्रक्रिया

अर्ज प्राप्त झाल्यानंतर स्थानिक बीट अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून अर्जदाराची प्रत्यक्ष चौकशी होईल. त्यानंतर हा अर्ज पुढील मान्यतेसाठी विशेष शाखेकडं पाठवला जाईल. त्यानंतर पुन्हा पडताळणी होऊन मंजुरी दिली जाईल.

PCC

८) त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी अर्ज महाआयटीच्या पोर्टलवर पाठवण्यात येईल, तिथं डिजिटल स्वाक्षरी केलेलं चारित्र्य व पूर्वइतिहास प्रमाणपत्र (PCC) पीडीएफ स्वरुपात तयार करुन अर्जदारास ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करुन देण्यात येईल.

PCC

९) अर्जाची माहिती वेळोवेळी एसएमएसद्वारे कळवण्यात येईल, पोर्टलवरही अर्जाची स्थिती पाहता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया ३० दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहील.

PCC