Sengol in Parliament Session : 'सेंगोल' पुन्हा चर्चेत यायचं कारण काय? असं काय घडलं राज्यसभेत?

Rashmi Mane

संसदेत अधिवेशन

लोकसभा निवडणुकीनंतर सध्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु आहे.

Sengol in Parliament Session | Sarkarnama

राष्ट्रपतींचे अभिभाषण

नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधी आणि सभापती निवडीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दोन्ही सभागृहातील अधिवेशनाला संबोधित केले.

Sengol in Parliament Session

संसदेत राजकारण तापलं

अधिवेशन चालू असतांना संसदेत स्थापन झालेल्या सेंगोलवरून राजकारण तापले आहे. आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू येतांना त्यांच्या सोबत सेंगोल आणले गेले आणि संसद भवनात सभापतींच्या आसनाजवळ ठेवण्यात आले.

Sengol in Parliament Session | Sarkarnama

समाजवादी पार्टी

त्यामुळे आता सेंगोल हटवण्याची मागणी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. समाजवादी पक्षाने (एसपी) सेंगोलला राजेशाहीचे प्रतीक म्हटले आहे आणि ते काढून टाकून त्या जागी राज्यघटना स्थापन करण्याची मागणी केली आहे.

Sengol in Parliament Session | Sarkarnama

सेंगोल म्हणजे काय ?

त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने संसदेत 'सेंगोल' स्थापन केले. 'सेंगोल' म्हणजे ''राज-दंड', याचा अर्थ 'राजाची काठी' असाही होतो.

Sengol in Parliament Session | Sarkarnama

विरोधकांचे जोरदार विरोध

राजेशाही संपवून देश स्वतंत्र झाला. देश 'राजाच्या दंडाने' चालणार की संविधानाने? संविधान वाचवण्यासाठी सेंगोल यांना संसदेतून हटवावे, अशी माझी मागणी आहे. असे म्हणत राज्यसभा खासदार आर.के. चौधरी यांनी जोरदार विरोध केला.

Sengol in Parliament Session | Sarkarnama

संविधान स्थापन करण्याची मागणी

सेंगोल हटवून भारताचे संविधान संसदेत स्थापन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Sengol in Parliament Session | Sarkarnama

Next : सागरिका घोष पुन्हा का आल्या चर्चेत; काय घडलं राज्यसभेत?