Rashmi Mane
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं वाद चांगलाच पेटला आहे.
संभाजी भिडे, ज्यांना भिडे गुरुजी म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि उजव्या विचारसरणीच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नेते आहेत.
भिडे यांचा जन्म 13 जून 1949 रोजी महाराष्ट्रातील सांगली या गावात झाला. भिडे यांनी पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात 'पीएचडी' केली आहे.
संभाजी भिडे यांचं मूळ नाव मनोहर भिडे आहे. 'भिडे गुरूजी' म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
संभाजी भिडे यांनी न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम.ए. केलं आहे. त्यानंतर ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते.
भिडे गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र, काही मतभेद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटनेची स्थापना केली. या संघटनेत विविध जातीधर्माच्या तरूणांचा समावेश असून, त्यातल्या प्रत्येकाला धारकरी म्हणतात.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या भिडे गुरुजींशी एका महिला पत्रकारानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 'कुंकू लाव तरचं तुझ्याशी बोलेनं', अशा शब्दांत भिडे यांनी बोलण्यास नकार दिला. पण भिडेंचं हे विधान हे एका महिलेचा अपमान असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
'निर्लज्ज लोकांमध्ये चीन आघाडीवर असून, परकियांचे दास्यत्व करत, परकियांचे खरकटं-उष्टं खात.. स्वाभिमानाची शून्य जाणीव नसलेला निर्लज्ज लोकांचा देश ज्याचे नाव हिंदुस्थान असल्याचेही भिडे म्हणाले होते.
'कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकानं उघडायला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकतोय त्याला पोलीस काठ्या मारत आहे. काय चावटपणा चाललाय? हा सर्व प्रकार महानालायकपणाचा आहे. या सर्व विरोधात लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. तसेच कोरोना हा रोगच नाहीए. हा गां*** वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे. काही-काही होत नाही,
'लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे आहे. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना हे आंबे खायला दिलेत. पथ्य सांगितले आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली'.