Ganesh Sonawane
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात आंबे खाल्ल्यानंतर मुले होतात असे विधान केले होते.
भिंडे यांच्या या विधानानंतर राज्यात प्रचंड वाद उफाळून आला होता. हा विषय संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.
नाशिकच्या राणेनगर येथे नुकतेच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भिंडेंनी आंब्याची गाथा पुन्हा सांगितली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या त्या वादग्रस्त विधानाची आठवण उपस्थितांना झाली.
मी एके ठिकाणी बोललो, त्यातील अर्धवट भाग काढून तो आंबा खा, मुले होतील म्हणून पसरवून दिले होते असं भिडे म्हणाले.
परंतु प्रत्यक्षात मला एका नागरिकाने त्याला जो आलेला अनुभव होता, तो मला सांगितल्याचे मी नमूद केले होते.
मात्र, ज्याला कुणाला खातरजमा करायची असेल, तो माणूस आजही अस्तित्वात आहे.
ज्याला कुणाला आंबा खायचा असेल त्याने तिथे जाऊन आंब्याची चव चाखावी, असे म्हणत भिडे यांनी आपल्या जुन्या वक्तव्याचा खुलासा केला.
सर्वधर्म समभाव म्हणजे षंढपणा असून हा प्रकार म्हणजे ना धड स्री ना पुरुष म्हणजेच नपुसंकपणा असल्याचं नव्याने विधान त्यांनी केलं आहे.