Jagdish Patil
होळी आणि शुक्रवारच्या नमाज संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संभलचे CO अनुज चौधरी हे सध्या चर्चेत आहेत.
नुकतंच संभलमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली फ्लॅग मार्चही काढण्यात आला होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनुज चौधरी हे कडक शिस्तेचे पोलिस ऑफिसर म्हणून ओळखले जातात.
त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व अन् कणखर शरीरच गुन्हेगारांना धडकी भरवण्यासाठी पुरेसं आहे.
ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.अनेकदा ते आपल्या बॉडीचे फोटो शेअर करत असतात.
कुस्तीपटू असलेले अनुज यांना जिममध्ये व्यायाम करायला आवडतं.
ते खेळ कोट्यातून यूपी पोलिसात भरती झाले आहेत. 2012 मध्ये त्यांना पोलिस उपाधीक्षक बनवण्यात आलं.
त्यांना 2002 आणि 2010 च्या राष्ट्रीय खेळांमध्ये दोन रौप्य पदके आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदक जिंकली आहेत.