सरकारनामा ब्यूरो
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गचे लोकोर्पण 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या महामार्गाच्या कामाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीपर्यंत पूर्ण झाला आहे.
समृद्धी महामार्गावर कमाल वेग मर्यादा ही १५० किमी प्रतितास आहे. ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग असून हा महामार्ग सहा पदरी आहे.
समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर या दरम्यानचा प्रवास हा तब्बल १६ तासांवरून ८ तासांवर येणार आहे.
या प्रकल्पासाठी ५५ हजार ३५५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
या महामार्गामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. यामध्ये शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंठा, एलोरा, औरंगाबाद, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला फायदा होणार आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील १0 जिल्ह्यातून जाणार असून त्यामुळे जिल्ह्यातील २६ तालुक्यातील ३९१ गावांच्या विकासाला फायदा होणार आहे.
नागपूर ते शिर्डी या ५२० किमी अंतरात महामार्गाच्या इन- आऊटला टोलनाके उभारण्यात आले असून. त्यामध्ये १.७३ प्रति किमीप्रमाणे ५२० किमी प्रवासासाठी प्रवाशांना अंदाजे ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.
हा महामार्ग देशातील सर्वात मोठा हरित मार्ग असणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंने ११ लाख वृक्षांची लागवड होणार आहे.
समृद्धी महामार्गाचे वैशिष्ठ म्हणजे हा महामार्ग रात्री उजळून निघतो आणि तोही सौरऊर्जेने. या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार आहे.
समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी सुमारे ९,९०० हेक्टर जमीन संपादित केली आहे. १०,००० हेक्टर जमीन कृषी समृद्धी नगर विकसित करण्यासाठी आणि १४५ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गाजवळील सुविधा आणि सुविधांसाठी वापरली जाईल.
समृद्धी महामार्गाला सहा बोगदे आहेत आणि त्यापैकी एक ७.७८ किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा आहे.