Pradeep Pendhare
राजकारणात अत्यंत नवखे असलेले 'सायबर कॅफेचालक' तरुण अमोल खताळ आता आमदार झालेत. तसेच फार्मा प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत.
अमोल खताळ यांचे शिक्षण बी.कॉम झाले असून 'डिप्लोमा इन Computer' अन् हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये शिक्षण घेतलेले आहे.
संगमनेर जिल्हा व्हावा, या आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या खताळ यांना पावणेदोन लाख स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवली होती.
लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात सर्वाधिक 15 हजार फॉर्म संगमनेरमधून मोफत भरून देण्याचा उच्चांक अमोल खताळ यांनी केलाय.
संगमनेरमधील कत्तलखान्यांविरोधात अमोल खताळ यांची नेहमीच आक्रमक भूमिका राहिली आहे.
2001-2016 पर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ते महाराष्ट्र प्रदेश सचिव, महासचिव, राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत वाटचाल.
2017-2023 मध्ये भाजपमध्ये सक्रिय होऊन संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष झाले.
भाजप महायुतीच्या आदेशानुसार शिवसेना पक्षात प्रवेश अन् दिग्गज बाळासाहेब थोरात यांचा खताळांनी 10 हजार 560 मतांनी निवडणुकीत पराभव केला.