Sania Mirza : सानिया होणार देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

सरकारनामा ब्यूरो

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरची सानिया मिर्झा देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे.

Sania Mirza | Sarkarnama

सानिया नॅशनल डिफेन्स अकादमीची (NDA) परीक्षा 149 व्या रँकने पास झाली आहे. 27 डिसेंबर रोजी पुण्यातील प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे.

Sania Mirza | Sarkarnama

मिर्झापूरपासून 10 किमी अंतरावर असणाऱ्या जसोवर गावची रहिवासी असून सानियाने गावामधील शाळेत 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. मिर्झापूरमधून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Sania Mirza | Sarkarnama

सानियाचे वडील शाहिद अली टीव्ही मेकॅनिक असून गावातील घरातच त्यांचे दुकान आहे. तिचे वडील म्हणतात, " फायटर पायलट म्हणून निवड होणारी सानिया देशाची दुसरी मुलगी आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी केवळ तिची इच्छा पूर्ण करण्यास मदत केली."

Sania Mirza | Sarkarnama

सानियाची आई तबस्सुम मिर्झा म्हणतात, "माझ्या मुलीने अवघ्या गावाची मान उंचावली आहे. तिने फायटर पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करून गावातील सर्वच मुलींना प्रेरित केले आहे."

Sania Mirza | Sarkarnama

हा तिचा 'एनडीए'चा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात तिची निवड झाली नव्हती. सानिया म्हणाली, "फायटर पायलट बनणे हे माझे ध्येय होते."

Sania Mirza | Sarkarnama

सानिया मिर्झा ही देशातील दुसरी अशी मुलगी आहे, जीची फायटर पायलट म्हणुन निवड झाली आहे.

Sania Mirza | Sarkarnama