Sanjay Raut : भरपावसात संजय राऊत राहुल गांधी सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी

सरकारनामा ब्यूरो

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे आज (20 जानेवारी) जम्मू येथे राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.

Rahul Gandhi, Sanjay Raut | Sarkarnama

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच राहुल गांधींची भेट घेतली.

Rahul Gandhi, Sanjay Raut | Sarkarnama

राऊत यांनी जम्मूमध्ये दाखल झाल्यावर, अनेक दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या काश्मिरी पंडितांची यावेळी भेट घेतली.

Rahul Gandhi, Sanjay Raut | Sarkarnama

भरपावसातही मोठ्यासंख्येत जनतेचा पाठिंबा भारत जोडो यात्रेला मिळत आहे.

Bharat Jodo Yatra | Sarkarnama

सियाचीनमध्ये तिरंगा फडकवणारे परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन बान्ना सिंग भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

Banna Singh, Rahul Gandhi | Sarkarnama

भारत जोडो यात्रेने आतापर्यंत 125 दिवसांत 3,400 किलोमीटरचे अंतर पुर्ण केले आहे. भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली.

Rahul Gandhi | Sarkarnama

30 जानेवारीला भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते.

Sarkarnama