Rashmi Mane
शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस.
राऊतांनी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी प्राप्त केली आहे.
संजय राऊतांची करिअरची सुरुवात पत्रकारितेपासून झाली. सुरुवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले.
राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. पत्रकारिता करत असताना संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत भरले. दैनिक सामना सुरू झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना बोलावून घेतले.
1989 ला सामना सुरू झाला. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले. संजय राऊत ‘रोखठोक’ शैलीत हे संपादकीय लिहीत असतात.
2004 ला राऊत पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले. त्यानंतर आजपर्यंत राज्यसभा सदस्य आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.
2019 च्या सत्तानाट्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणण्यासाठी राऊतांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.