Deepak Kulkarni
हरदीप सिंग पुरी हे मुत्सद्दी राजकारणी आणि मोदी सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
हरदीप पुरी यांचे नाव २०२६ मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाच्या फाईल्स आणि फोटोंमुळे विरोधकांनी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी जोडले आहेत.
विरोधकांच्या आरोपांवर पुरी यांनी खुलासा करताना ते एपस्टीनला केवळ एका शिष्टमंडळाच्या किंवा व्यावसायिक निमित्ताने भेटले असल्याचं म्हटलं होतं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा एपस्टिनसोबतचा मिटिंग करत असतानाचा फोटो पोस्ट केला आहे. यामुळे पुन्हा एकदा सरकार हादरलं आहे.
हरदीप सिंग पुरी हे 1974 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी राहिले आहेत.
संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांनी 2009 ते 2013 या काळात काम केलं आहे.
मंत्री पुरी यांनी यापूर्वी जानेवारी 2011 ते फेब्रुवारी 2013 पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं आहे.
संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री पुरी आणि जेफ्री एपस्टिन यांचे फोटो सोशल मीडियावर ट्विट करतानाच रेजिम चेंज (सत्तापालट) मध्ये काही विकेट्स पडणार असल्याचा दावा केला आहे. ही तर सुरुवात आहे, असा इशाराही दिला आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची २०१७ मध्ये एन्ट्री झाली होती. त्यांनी विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणाली (RIS) चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.