सरकारनामा ब्यूरो
31 ऑक्टोबर 1875 रोजी सरदार वल्लभभाई पटेलांचा जन्म गुजरातमधील नाडियाद गावात झाला.
१९२८ मध्ये गुजरातमधील बरडोली तालुक्यातील लोक पूर आणि ओल्या दुष्काळमुळे त्रस्त झाले होते.
अशा संकटात असताना ब्रिटिशांनी तेथील शेतकऱ्यांच्या महसूल करात ३० टक्के वाढ केली.
पटेलांनी पुढाकार घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून राज्यपालांना कर कमी करण्याची विनंती केली.
पटेल यांनी शेतकऱ्यांना सांगितले, कराचा एकही रुपया भरायचा नाही.
हा संघर्ष दडपण्याचा अतोनात प्रयत्न केल्यावर शेवटी ब्रिटिश सरकार त्यांच्यासमोर झुकले.
या संघर्षात त्यांचे मोठे योगदान होते.
बरडोली आणि संपूर्ण देशात त्यांचा राजकीय प्रभाव निर्माण झाला व ते सरदार म्हणून ओळखले जाऊ लागले.
अनेक कार्यात कर्तृत्ववान कामगिरीसाठी त्यांना 'लोहपुरुष' ही पदवी मिळाली.