Vilasrao Deshmukh Birth Anniversary : सरपंच ते मुख्यमंत्री...! 'असा' होता विलासराव देशमुखांचा राजकीय प्रवास

Deepak Kulkarni

राज्यात, केंद्रात दबदबा....

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा आज जन्मदिवस आहे.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

जन्म

त्यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील लातूरमधील बाभळगाव या गावी झाला.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

सरपंचपदापासून सुरुवात

देशमुख यांनी 1974 मध्ये बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

राजकीय प्रवास...

युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत ते 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

आमदारकीची हॅट्रिक...

त्याच मतदारसंघातून 1985 आणि 1990 मध्ये पुन्हा निवडून आले.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

पहिल्यांदा राज्यमंत्रिपद

1982 मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद

आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनीनंतर मागे वळून पाहिले नाही.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

सदैव मंत्रिमंडळात

पुढे 1995 पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

दोनदा मुख्यमंत्री

13 ऑक्टोबर 1999 ला विलासराव पहिल्यांदा आणि 2004 च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

मुख्यमंत्रीपद गमावलं...

2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना आपले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. 2009 ते 2011 दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे ते मंत्री होते.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

यकृत प्रत्यारोपणाचे प्रयत्न अयशस्वी

यकृत प्रत्यारोपणाचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि देशमुख यांचे वयाच्या 67 व्या वर्षी 14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले.

Vilasrao Deshmukh Birth Anniversary | Sarkarnama

NEXT : काशी विश्वनाथ ते नवीन संसद भवन, पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्टचे 'आर्किटेक्ट' बिमल पटेल आहेत तरी कोण?