सरकारनामा ब्यूरो
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे.
पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबेंना उमेदवारी देण्यात आली होती.
खरेच्या क्षणी सुधीर तांबेंनी माघार घेत सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडखोरी केल्यामुळे त्यांचं काँग्रेसमधून निलबंन करण्यात आलं होतं.
सत्यजीत तांबे यांच्या विजयाची कारणे काय आहेत? हे जाणून घेऊया..
डॉ.सुधीर तांबे या मतदारसंघातून तीन टर्म आमदार :
सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघातून तब्बल तीन टर्म आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा या मतदारसंघावर चांगला प्रभाव राहिला आहे
मोठी मतदार नोंदणी आणि प्रभावी प्रचार यंत्रणा
डॉ.सुधीर तांबे यांच्या निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनामुळे सत्यजीत तांबे यांचा विजय सोपा झाला. त्यांनी पदवीधरांची मोठी मतदार नोंदणी केली होती.
प्रत्येक जिल्ह्यात स्वत:ची यत्रंणा
नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यामध्ये सत्यजीत तांबे यांची स्वत:ची यत्रंणा कार्यरत होती.
पाचही जिल्ह्यात छुपा पाठिंबा
निलंबनाची कारवाई होऊन देखील काँग्रेसच्या 'एका' गटाने तांबेंना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील काही पदाधिकारी होते. तसेच पाचही जिल्हात भाजपचा छुपा पाठिंबा होता.