SBIच्या 'एफडी', 'आरडी'चे व्याजदर बदलले; काय आहेत नवीन व्याजदर?

Amit Ujagare

स्टेट बँकेनं व्याजदर घटवले

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिायानं (एसबीआय) आपल्या गुंतवणूक खात्यांवरील म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट अन् रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज दरांमध्ये बदल केले आहेत.

15 ऑगस्टपासून लागू

एसबीआयनं ३ कोटी आणि त्याहून अधिक रक्कमेच्या घरगुती बल्क टर्म डिपॉझिट खात्यांवर काही काळासाठी व्याज दरांमध्ये कपात केली आहे. त्यानुसार, नवे व्याज दर हे १५ ऑगस्टपासून लागूही झाले आहेत.

कुठल्या एफडीमध्ये बदल?

यामध्ये छोट्या कालावधीसाठीच्या बल्क एफडीवर प्रामुख्यानं हे बदल करण्यात आले आहेत. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसह वरिष्ठ नागरिकांना देखील बसणार आहे. पण ३ कोटींहून कमी सामान्य रिटेल एफडीच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही.

व्याजदरात किती कपात?

एसबीआयनं ७ दिवसांपासून १७९ दिवसांच्या बल्क एफडीच्या व्याजदरात २५ बेसिस पॉईंटनं म्हणजे ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. १८० ते २१० दिवसांच्या बल्क एफडीवर १० बेसिस पॉईंट (०.१० टक्के) कपात केली आहे.

यासाठी बदल नाही

पण २११ दिवस ते १० वर्षांसाठीच्या बल्क एफडीच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही. म्हणजे ज्या ग्राहकांची मोठी रक्कम एसबीआयमध्ये मोठ्या कालावधीपासून गुंतवलेली आहे, त्यांच्या व्याजदरात कुठलाही बदल झालेला नाही.

SBI | Sarkarnama

ज्येष्ठ नागरिकांवरही परिणाम

बँकेच्या या निर्णयाचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांवरही झाला आहे. नवे व्याजदर हे नव्यानं एफडी करणाऱ्या आणि मॅच्युअर होत असलेल्या एफडीच्या रिन्युअलवर लागू असणार आहेत.

१ टक्का दंड

तसंच प्रिमॅच्युअर अर्थात बल्क एफडीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच जर ही एफडी तोडली तर त्यावर १ टक्के दंड आकारण्यात येणार आहे. हा नियम नव्या गुंतवणुकीसह रिन्युअल होणाऱ्या एफडीवर देखील लागू आहे.

Bank | Sarkarnama

सर्वसामान्य ग्रहकांना दिलासा

तसंच ३ कोटींहून कमी किंमतीची एसबीआयमध्ये एफडी केली तर त्यावर कुठल्याही व्याजदरात कपात केलेली नाही. त्यामुळं सामान्य ग्राहकांना रिटेल एफडीवर ३.०५ टक्क्यांहून ६.४० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.५५ टक्क्यांहून ७.०५ टक्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.

बाजार समितीत कांद्याचे लिलाव कसे होतात? प्रक्रिया काय असते?

Onion Bhavan
इथे क्लिक करा...