Rashmi Mane
देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे रविवारी 28 मे ला उद्घाटन करतील.या विशेष प्रसंगी पंतप्रधान ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या 'सेंगोल'चीही स्थापना करणार आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, नवीन संसदेच्या उद्घाटना प्रसंगी तामिळनाडूतील विद्वान पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'सेंगोल' देतील. मग हा सेंगोल संसद भवनात ठेवण्यात येणार आहे.
'सेंगोल' हा शब्द तामिळ शब्द 'सेम्माई' या शब्दावरून घेतला आहे, ज्याचा अर्थ 'धार्मिकता' आहे. 'सेंगोल' हा एक प्रकारचा राजदंड आहे. चांदीच्या सेंगोलवर सोन्याचा थर असतो. त्यावर भगवान शंकराचे वाहन नंदी कोरण्यात येतो. या सेंगोलची उंची पाच फूट इतकी आहे.
15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंना स्वातंत्र्याच्या १५ मिनिटे आधी सेंगोल हा राजदंड सुपूर्द करण्यात आला होता. तामिळनाडूतील परंपरेनुसार, राज्याचे मुख्य पुजारी (राजगुरु) नवीन राजाला सत्ता ग्रहण केल्यावर हा राजदंड देतात.
भारताचे शेवटचे 'व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन' यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 11.45 वाजता म्हणजेच स्वातंत्र्याच्या 15 मिनिटे आधी थिरुवदुथुराई अधनम मठाच्या राजगुरूंकडून माउंटबॅटन यांना राजदंड दिला. त्यानंतर त्यांनी तो नेहरूंना प्रदान केला.
चोल साम्राज्यापासून सुरु आहे ही प्रथा. जेव्हा या साम्राज्याचा राजा आपला उत्तराधिकारी घोषित करतो तेव्हा तो सेंगोलला सत्ता हस्तांतरण म्हणून देत असे. सेंगोल देण्याची परंपरा चोल साम्राज्यापासूनच आहे.
प्रयागराज येथील नेहरू घराण्याचे वडिलोपार्जित निवासस्थान असलेल्या संग्रहालयात म्हणजेच 'आनंद भवनात' हा राजदंड ठेवण्यात आला होता.