Roshan More
रिंकू सिंह राही हे उत्तर प्रदेशमध्ये समाज कल्याण अधिकारी होते.
मुजप्फरनगर जिल्ह्यात समाज कल्याण अधिकारी असताना रिंकू यांनी तब्बल 100 कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघड केला.
रिंकू सिंह यांनी शिष्यवृत्ती घोटाळा उघड केल्यानंतर त्यांच्यावर घोटाळ्याशी संबंधित माफीयांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या.
या हल्यात रिंकू सिंह हे गंभीर जखमी झाले. तब्बल एक महिना त्यांच्यावर उपचार सुरू होते.
2012 मध्ये रिंकू यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यांना 2018 मध्ये सस्पेंड करण्यात आले होते.
रिंकू यांनी युपीएससीचे कोचिंग क्लास चालवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
रिंकू सिंह यांनी 2021 मध्ये दिव्यांग कोट्यातून युपीएससीची परीक्षा दिली होती. 2021 मध्ये ते परीक्षा पास झाले.
ज्या मुजफ्फरनगरमध्ये रिंकू सिंह यांच्या गोळ्या झाडल्या त्याच जिल्ह्यात IAS म्हणून रिंकू यांची नियुक्ती झाली आहे.