Jagdish Patil
यंदाची दिवाळी पवार कुटुंबियांनी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, सोमवारी (ता.20) नरक चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण पवार फॅमिलीने बारामतीतील एका मॅकडोनाल्ड्सच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली.
खुद्द शरद पवारांसह या उद्घाटन सोहळ्याला प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार देखील उपस्थित होते.
त्यामुळे बारामतीतील हे मॅकडी नक्की कोणाचं आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.
तर शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय ज्या मॅकडी आऊटलेटच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. ते इरा पवार यांचं आहे.
इरा पवार या आमदार रोहित पवारांची चुलत बहीण, म्हणजेच त्या राजेंद्र पवार यांचे बंधू रणजीत पवार यांच्या कन्या आहेत.
तर शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांचीही नातं आहे. त्यामुळे सर्व पवार कुटुंब या आऊटलेटच्या उद्घाटनासाठी हजर होतं.
सुप्रिया सुळेंनी बारामतीमधील उद्घाटन सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
शिवाय हे फोटो शेअर करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांनी 'इरा पवार, तुझा खूप अभिमान आहे!' असं कॅप्शन दिलं आहे.