Dilip Walse-Patil Birthday : शरद पवारांचे पीए ते राज्याचे सहकारमंत्री; दिलीप वळसे पाटलांचा प्रवास एका क्लिकवर

Rashmi Mane

दिलीप वळसे पाटील

शरद पवारांचे स्वीय सहायक ते राज्याचे सहकारमंत्री, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बंडानंतर दिलीप वळसे पाटील यांचे नाव चांगलेच गाजले.

Dilip Walse Patil | Sarkarnama

स्वीय सहायक

दिलीप वळसे पाटलांना विधिमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या वळसे पाटलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणूनही काम केले आहे.

Dilip Walse Patil | Sarkarnama

वडिलांचे मार्गदर्शन

वळसे पाटील यांचा जन्म (30 ऑक्टोबर 1956) ला झाला. 1990 मध्ये आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा उदय झाला. दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.

Dilip Walse Patil | Sarkarnama

महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात सक्रिय

महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात तसेच सहकारी चळवळीमध्ये राज्यातील नेत्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.

Dilip Walse Patil | Sarkarnama

सलग सातव्यांदा आमदार

आतापर्यंत दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत.

Dilip Walse Patil | Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी

2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.

Dilip Walse Patil | Sarkarnama

अनेक महत्त्वाच्या पदांचा पदभार

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, ऊर्जामंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, वित्त व नियोजनमंत्री, विधानसभा अध्यक्ष, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री, गृहमंत्री अशा अनेक पदांचा कारभार वळसे पाटलांनी सांभाळला आहे.

Dilip Walse Patil | Sarkarnama

शरद पवारांचे एकनिष्ठ

राजकारणात आल्यापासून शरद पवार यांचा शब्द शेवटचा असायचा, पवारांचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, राजकीय बंडात सामील होत अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत.

Dilip Walse Patil | Sarkarnama

Next : व्हायचं होतं शास्त्रज्ञ, झाल्या 'आयपीएस' अधिकारी; जाणून घ्या अनुकृती शर्मांबद्दल...

येथे क्लिक करा