Rashmi Mane
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बंडानंतर दिलीप वळसे पाटील यांचे नाव चांगलेच गाजत आहे.
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.
वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.
महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात तसेच सहकारी चळवळीमध्ये राज्यातील नेत्यांच्या सानिध्यात राहून सक्रिय सहभाग होता.
आतापर्यंत वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत.
2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री , ऊर्जामंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, वित्त व नियोजनमंत्री, विधानसभा अध्यक्ष, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री, गृहमंत्री अशा अनेक पदांचा कारभार वळसे पाटलांनी सांभाळला आहे.
राजकारणात आल्यापासून शरद पवार यांचा शब्द शेवटचा असायचा, पवारांचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, ते आज अजित पवारांच्या बंडात सामील झाले आणि त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.