Sharad Pawar Solapur Visit: कार्यकर्त्याच्या शब्दाचा मान राखण्यासाठी शरद पवारांनी भरपावसात गाठला लग्नमंडप...

Deepak Kulkarni

पवारांचा पॅटर्न....

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

पवारांची खास ओळख...

त्यांनी कोणाला शब्द दिला तर मग ते कोणत्याही परिस्थितीत तो पूर्ण करतात.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

सोलापूर दौरा...

शरद पवार हे रविवारी (दि.७) सोलापूर दौऱ्यावर आले होते.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

अभिजीत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश...

पवार यांच्या उपस्थितीत साखर सम्राट म्हणून नव्याने उदयास आलेल्या अभिजीत पाटील यांनी पंढरपूर येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

शब्द पाळला...

शरद पवारांनी सोलापुरातील आपल्या सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळला आणि त्याच्या भर पावसात त्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहिले.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

चर्चेचा विषय...

यावेळी देखील भरपावसात शरद पवारांनी लग्नाला हजेरी लावल्याने त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा केली जात आहे.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

विवाह सोहळा...

सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा रविवारी पार पडला.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

भर पावसात पवारांचं आगमन

या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र, अचानक लग्न सोहळ्यादरम्यान पाऊस सुरू झाला. मात्र भर पावसात शरद पवार यांचे आगमन झाले.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

साताऱ्याची पुनरावृत्ती सोलापुरात..

यापूर्वी साताऱ्यात भरपावसातली शरद पवार यांची सभा गाजली होती.

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

राजीनामा नाट्यानंतर मैदानात...

राजीनामा नाट्यानंतर शरद पवार यांचा सोलापुरात पहिलाच दौरा होता. पंढरपूर आणि सांगोल्यात दिवसभर दौरा करून शरद पवार सोलापुरात आले होते. 

Sharad Pawar Solapur Visit | Sarkarnama

NEXT : 'त्या' खटल्यानंतर उज्वल निकम यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही...