NCP MLAs Disqualification : शरद पवारांनी केली 'या' नेत्यांवर कारवाई

Rashmi Mane

राष्ट्रवादीला मोठे खिंडार

अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडले आहे.

Ajit Pawar Oath ceremony | Sarkarnama

मंत्रिपदाची शपथ

अजित पवारांसह नऊ आमदारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. 

Ajit Pawar Oath ceremony | Sarkarnama

खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar Oath ceremony | Sarkarnama

आक्रमक कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आता राष्ट्रवादीकडून बंडखोरांवर कारवाई करण्याबाबत आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

Ajit Pawar Oath ceremony | Sarkarnama

दोन खासदारांची हाकालपट्टी

शपथविधीला उपस्थित आलेल्या दोन खासदारांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे.

Ajit Pawar Oath ceremony | Sarkarnama

कारवाईचा प्रस्ताव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर कारवाईचा प्रस्ताव शरद पवारांकडे पाठवला होता. 

Oath ceremony | Sarkarnama

पक्षाच्या नियमांचे उल्लंघन

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 ला पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. 

Praful Patel, Ajit Pawar | Sarkarnama

बडतर्फतेची कारवाई

आता राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथसोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. याच धर्तीवर आता खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर बडतर्फतेची कारवाई केली आहे.

Sunil Tatkare, praful patel | Sarkarnama

Next : 'डॉक्टर' ते 'आयएएस' अधिकारी ; पहिल्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मिळवला दुसरा क्रमांक !