Sharad Pawar Wedding Anniversary असा आहे शरद पवारांच्या लग्नाचा किस्सा ; प्रतिभाताईंना न पाहताच दिला लग्नाला होकार !

सरकारनामा ब्यूरो

लग्नाचा वाढदिवस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लग्नाचा आज 57 वा वाढदिवस आहे.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

लग्नगाठ बांधली

एक ऑगस्ट 1967 साली शरद पवारांनी लग्नगाठ बांधली.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

सुप्रिया सुळेंची पोस्ट व्हायरल

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आई-बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

खास गोष्ट

जाणून घेऊया, शरद पवार यांच्या लग्नाची एक खास गोष्ट.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

प्रतिभा पवार यांच्याबद्दल...

प्रतिभा पवार या क्रिकेटपटू सदू शिंदे यांच्या कन्या आहेत. शरद पवारांचे मोठे भाऊ माधवराव पवार यांचे घनिष्ठ मित्र अरविंद राणे यांच्या प्रतिभाताई भाची. अरविंद राणे यांनीच शरद पवारांसाठी प्रतिभा यांचं स्थळ सुचवलं.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

आईंच्या आग्रहाखातर

आमदारकी मिळाल्याने शरद पवार आधी लग्नासाठी तयार नव्हते. मात्र, आईच्या आग्रहाखातर मुलगी पाहण्यासाठी तयार झाले.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

मुलगी न बघताच दिला होकार

आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतिभाताई यांना न पाहाताच शरद पवारांनी लग्नासाठी होकार दिला होता. असं सांगितलं जातं की, जेव्हा मुलगी पाहायला गेले तेव्हा ते मुलीला न पाहाता वर्तमानपत्र वाचत बसले होते.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

लग्नादिवशीही कार्यकर्यांच्या गाठीभेटी

एक ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच लग्न झालं. लग्न यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक आल्यानंतरच लावायचं असं ठरलं होतं. त्यामुळे लग्नाच्या दिवशीही शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

अखेर संध्याकाळी लागले लग्न

अखेर संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक लग्नमंडपात आले, तेव्हा शरद पवार व प्रतिभा पवार यांचा विवाह पार पडला. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर प्रतिभाताई पवार शरद पवार यांना म्हणाल्या होत्या की, आणखी दहा मिनिटं उशीर झाला असता तर त्या तिथेच कोसळल्या असत्या.

Sharad Pawar Pratibhatai Pawar Marriage Anniversary | Sarkarnama

Next : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या भाजी मंडई, तुळशीबागेत जातात तेव्हा....|

येथे क्लिक करा