Jagdish Patil
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे.
निवडीनंतर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच साहित्य महामंडळ आणि मराठी वाचकांचे आभार मानले.
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म १ जून १९५६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे झाला.
हन्नूर येथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात MA पूर्ण केले.
मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासावर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून PHD केली.
१९८६ ते १९९२ या काळात त्यांनी सोलापूर आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून काम केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक आणि प्रकाशन विभागाचे संचालक म्हणून काम केले.
त्यांच्या 'अक्करमाशी' या आत्मचरित्राचे इंग्रजीसह विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांनी ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
'सनातन' या कादंबरीसाठी त्यांना २०२० मध्ये प्रतिष्ठित सरस्वती सन्मान मिळाला.
२०११ मध्ये झालेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.