Rashmi Mane
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली.
लोकसभेसाठी साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगावचे आहेत. शिंदे हे पदवीधर असून माथाडी कामगारांचा नेता म्हणून परिचित आहेत.
1999 मध्ये ते प्रथम जावळीतून राष्ट्रवादीचे आमदार झाले. त्यानंतर ते जलसंपदा मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर आमदार शालिनीताई पाटील यांचा कोरेगावमध्ये येऊन पराभव केला होता. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन पंचवार्षिक आमदार होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत. राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष आहेत.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.