अनुराधा धावडे
शिक्षक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी जॉब स्विच’ असा एक अनोखा उपक्रम राबवला.
या उपक्रमात भोसरी आणि काळेवाडी येथील महापालिकेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आयुक्तांची भूमिका बजावली तर खुद्द आयुक्त शेखर सिंह शिक्षक झाले होते.
महापालिकेच्या दारात आयुक्तांची लाल दिव्याची गाडी थांबली आणि आयुक्त करण काकडे आणि आयुक्त अपेक्षा माळी गाडीतून उतरले. सुरक्षा रक्षकांनीही त्यांना सॅल्युट केले
आयु्क्त झालेल्या अपेक्षा माळी आणि किरण काकडे यांनी महापालिकेचं कामकाज कसे चालते आणि आयुक्तांची जबाबदारी काय असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला
तर दुसरीकडे आयुक्त शेखर सिंह यांनी देखील संत तुकाराम नगर येथील महापालिकेच्या शाळेत जाऊन शिक्षकांच्या रुपात विद्यार्थ्यांना धडे दिले.
आयएएस या पदापर्यंत पोहचण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि या पदाला किती मान असतो हे जाणून अपेक्षा आणि किरण दोघेही खूप प्रभावित झाले आणि आपणही मोठे होऊन आयएएस होऊ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ञांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. तसेच शाळेतील शिक्षकांच्या अडचणीही सोडवण्यासाठी आपण कायम प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.