Eknath Shinde : शिंदे गटाचा 'सोशल मीडिया स्ट्राईक'; एकनाथ शिंदेंसह 'या' नेत्यांनी ठेवले सावरकरांचे फोटो!

सरकारनामा ब्यूरो

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे.

New profile photo | Sarkarnama

राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचं म्हणत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे.

New profile photo | Sarkarnama

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने (शिंदे गट) ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे.

New profile photo | Sarkarnama

या यात्रेची पूर्वतयारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी फेसबुक, ट्वीटरचे कव्हर व प्रोफाइल फोटो बदलले आहेत.

New profile photo | Sarkarnama

एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक, ट्विटरवर याआधी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. 

New profile photo | Sarkarnama

आता त्या जागी सावरकरांचा फोटो लावण्यात आला आहे.

New profile photo | Sarkarnama

प्रोफाइल फोटोवर ‘आम्ही सारे सावरकर’ असं नमूद करण्यात आलं आहे.

New profile photo | Sarkarnama

कव्हर फोटोवर सावरकरांच्या कवितेच्या 'अनादि मी अनंत मी… अवध्य मी भला…' या कवितेच्या ओळी आहेत.

New profile photo | Sarkarnama

Next: विद्यार्थी नेते म्हणून सुरू झाला कन्हैयाकुमार यांचा राजकीय प्रवास