Ganesh Sonawane
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी पहिला दसरा मेळावा पार पडला.
मार्मिक'मधून पहिल्या दसरा मेळाव्याला येण्याचं आवाहन करण्यात आलं. मेळाव्यात बाळासाहेबांचा शर्ट-पँट असा साधा वेश होता.
मुंबईत शिवाजी पार्कवर तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी उसळली. उपस्थितांमध्ये स्टीलचा डबा फिरवून देणगी जमा करण्यात आली होती.
मेळाव्याला एकाही पोलिसाचं संरक्षण नव्हतं. महाराष्ट्रातील अनेक पैलवानांकडे सुरक्षेची धुरा सोपवण्यात आली होती. मेळाव्यासाठी चाळी, छोट्या खोल्या, व्यायामशाळांत बैठका झाल्या होत्या.
1975 साली दसरा मेळाव्यातूनच शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला
1982 साली शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आले होते. 1985 साली शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका मेळाव्यात जाहीर करण्यात आली.
1991 च्या मेळाव्यात वानखेडेवरील भारत-पाक सामन्याला विरोध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला. 1996 साली राज ठाकरेंच्या कल्पनेतल्या शिवउद्योग सेनेची घोषणा करण्यात आली.
2010 च्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचे लॉन्चिंग करण्यात आले. युवा सेना या संघटनेची घोषणा करण्यात आली.
2011 साली बाळासाहेबांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अखेरचा मेळावा पार पडला. 2012 साली प्रकृतीमुळे बाळासाहेबांचं रेकॉर्डेड भाषण दाखवलं.
तर, २०१३ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पहिला दसरा मेळावा झाला.
NEXT : नाशिकमध्ये होणार दोन विश्वविक्रम ; कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यात काय घडणार?