Rashmi Mane
30 ऑक्टोबर 1966 मध्ये शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा घेण्यात आला होता.
या दसरा मेळाव्यामुळे मराठी माणसांचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचं अनोखं नातं निर्माण होण्यास सुरुवात झाली.
दसरा म्हटलं की, शिवसैनिकांनी तुडुंब भरलेलं शिवाजी पार्क असं समीकरणंच रूढ झालं.
19 जून 1966 ला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.
त्यानंतर ३० ऑक्टोबर1966 ला पहिल्यांदा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
बाळासाहेब ठाकरे दरवर्षी दसरा मेळाव्यातून शिवसेनेची वर्षभरातील रणनीती सांगायचे, त्यामुळे शिवसैनिक आवर्जून मोठ्या संख्येने दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहायचे.
गेल्या 56 वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो.
शिवाजी पार्क... मुंबापुरीची शान ! याच शिवाजी पार्कमध्ये आजवर अनेक सभा गाजल्या आहेत.