Roshan More
नगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगरचा साधा दुधवाला — डोक्यावर गांधी टोपी, पांढरा कुर्ता-पायजमा आणि हातात दुधाची किटली! हाच ‘दुधवाला’ स्वतःच्या कतृत्वाने आमदार, मंत्री झाला.
दुधवाला ते आमदार, मंत्री असा प्रवास केलेल्या व्यक्तीचे नाव म्हणजे शिवाजीराव कर्डिले.
सरपंचपदापासून शिवाजी कर्डिलेंनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली.
1995 मध्ये ते पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि विजयी झाली.
विधानसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातून त्यांनी तब्बल पाच वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं. ते राज्यमंत्री देखील होते.
2009 मध्ये शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 आणि 2014 मध्ये ते भाजप आमदार म्हणून विजयी झाली.
2019 मध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंकडून पराभव झाला.
2019 च्या पराजयाची परतफेड करत त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरेंचा पराभव केला. मात्र, आज (शुक्रवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.