Jagdish Patil
भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून NCRB च्या अहवालातून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
NCRB ने 'विद्यार्थी आत्महत्या: भारतातील वाढती महामारी' हा अहवाल वार्षिक IC-3 परिषदेत प्रसिद्ध केला.
मागील 10 वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी चिंतनीय आहे. 0 ते 24 या वयोगटातील मुलांची संख्या कमी होऊन 58.2 कोटींवरून 58.1 इतकी झाली आहे.
आत्महत्या करणाऱ्यांची संख्या 6,654 वरून 13,044 वर पोहोचली आहे. मागील 10 वर्षात त्यात 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत 50 टक्के तर विद्यार्थिनींच्या 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक आत्महत्यांचे प्रमाण देशातील एकूण आत्महत्यांपैकी एक तृतीयांश इतकं आहे. तर यामध्ये राजस्थानचा दहावा नंबर आहे.
2022 मधील आकडेवारीनुसार या वर्षात एकूण 53 टक्के मुलांनी आत्महत्या केल्या.
तर 2021 ते 2022 दरम्यान मुलांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण 6 टक्क्यांनी घटलं, तर मुलींचं 7 टक्क्यांनी वाढलं.