Rashmi Mane
राजकीय नेते म्हणलं की दौरे, बैठका यात बिझी असणारे नेते मंडळी अधिवेशन काळात वेगळ्याच 'लूक'मध्ये दिसतात.
विरोधी पक्षाचे आंदोलन असो की नेत्यांमधले आरोप- प्रत्यारोप अधिवेशनात अजून एक गोष्ट चर्चेची ठरते ती, म्हणजे त्यांचा ड्रेसिंग सेन्स.
भाजपच्या आमदार श्वेता महाले सभागृहाच्या कामकाजासाठी एका छान स्टाईलमध्ये विधान भवनात पोहोचल्या.
साडी असो वा ड्रेस श्वेता महालेंचे वेगळेपण नेहमीच दिसून येत.
कलमकारी साड्या, सिफॉन, कॉटन किंवा सिल्कच्या साड्या त्यांच्या कलेक्शनची चर्चा महिलांमध्ये होत असते.
2020 च्या विधानसभा अधिवेशनात मराठी भाषा दिनाच्या दिवशीही आमदार श्वेता महालेंच्या साडीची विधानभवनात चर्चा होती. त्या साडीवर “मातृभुमे! नमो मातृभुमे! नम:, तव गरिभ्यो नमस्ते नदीभ्यो नम:, तव वनेभ्यो नमो जनपदेभ्यो नम:” अशी संस्कृत वचनं लिहिली होती.
याही अधिवेशनात आमदार श्वेता महाले, त्यांच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत आहेत.