Shweta Tiwari Troll : श्वेता तिवारीने अभिजित दिपकेंचा व्हिडिओ शेअर करताच प्रचंड ट्रोल; पंजाब पेपर फुटीचे काय आहे प्रकरण

Pradeep Pendhare

मोदी सरकार झुकले

NEET पेपरफुटी घोटाळ्यानंतर दिल्लीतील 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनापुढे केंद्रातील मोदी सरकारला झुकावे लागले.

Narendra Modi | Sarkarnama

प्रधानांच्या राजीनाम्याचे स्वागत

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच, या मोठ्या लढ्याला यश येताच, देशभरातून या निर्णयाचे स्वागत झाले.

Narendra Modi | Sarkarnama

श्वेताचा उपरोधिक टोमणा

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने मात्र यावर अभिजित दिपके यांना मारलेला एक उपरोधिक टोमणा तिच्या चांगलाच अंगलट आला आहे.

Shweta Tiwari Troll | Sarkarnama

तुफान ट्रोल

नेटिझन्सनी श्वेता तिवारीला सोशल मीडियावर इतके तुफान ट्रोल केले आहे की, तिची बोलतीच बंद झाली आहे.

Shweta Tiwari Troll | Sarkarnama

श्वेताची इन्स्टाग्राम स्टोरी

अभिजित दिपके यांचा व्हिडिओ शेअर करत श्वेताने इन्स्टाग्राम स्टोरीवर, "आता पंजाबचे शिक्षण मंत्री कधी राजीनामा देणार? आणि तिथे CJP आंदोलन कधी सुरू करणार?"

Shweta Tiwari Troll | Sarkarnama

श्वेताची 'CJP'वर टिप्पणी

पंजाबमध्ये 'आप'चे सरकार असल्याने श्वेताने CJPवर राजकीय टिप्पणी केली. तिचा हा टोमणा आंदोलक विद्यार्थ्यांना आणि नेटकऱ्यांना मुळीच आवडला नाही.

Shweta Tiwari Troll | Sarkarnama

युजरकडून उपरोधिक टोमणे

एका युजरने उपरोधिकपणे लिहिले, "मॅडम, CJPवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्हीच पुढाकार घ्या आणि पंजाब सरकारविरुद्ध उपोषण सुरू करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत!" असे म्हटले.

Shweta Tiwari Troll | Sarkarnama

तुम्ही फक्त रील्स बनवा

"21 मृत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी 36 दिवस रक्ताचे पाणी केले, त्यांना विचारण्यापेक्षा तुम्ही फक्त रील्स बनवा आणि ब्रँड प्रमोशन करा." असा सणसणीत टोला लगावला.

Shweta Tiwari Troll | Sarkarnama

आंदोलन तर करा...

"तुमच्या मुलीला सोबत घ्या अन् पंजाबला आंदोलनाला बसा, आम्ही 20 दिवसांनी तुम्हाला जॉईन करतो," असा उपरोधिक सल्लाही दिला.

Shweta Tiwari Troll | Sarkarnama

NEXT : नंदन नीलेकणींकडे जबाबदारी!

येथे क्लिक करा :