Ganesh Thombare
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे.
बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी के.चंद्रशेखर राव यांनी मोठा प्लॅन आखला आहे.
KCR हे आज (दि.26 जून) महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांच्या ताफ्यात 600 गाड्या अन् अख्खे मंत्रिमंडळ आहे.
के.चंद्रशेखर राव हे भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत.
चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यात तेलंगणातील सर्व मंत्री, खासदार-आमदारांचा समावेश आहे.
के.चंद्रशेखर राव हे उद्या पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेणार आहेत.
के.चंद्रशेखर राव हे आज सोलापूरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं.
के.चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याने महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे लक्ष वेधले आहे.