तुम्ही SIR प्रक्रिया पूर्ण केलीये पण 24 ऑगस्टला नाव दिसलं नाही तर? 24 तासांत 'ही' एक गोष्ट कराच!

Rashmi Mane

SIR प्रक्रिया पूर्ण

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गणना अर्जांच्या डिजिटायझेशनची मुदतही सोमवारी संपली.

Maharashtra SIR | Sarkarnama

आता 24 ऑगस्टला काय?

24 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत आपलं नाव आहे की नाही, हे प्रत्येक मतदाराने तपासणं महत्त्वाचं आहे.

Maharashtra SIR | Sarkarnama

नाव दिसलं नाही तर?

प्रारूप यादीत नाव आढळलं नाही तरी घाबरू नका. तुमच्याकडे नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दावा दाखल करण्याची संधी असेल.

Maharashtra SIR | Sarkarnama

दावा कधी करता येईल?

24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या कालावधीत मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी दावा दाखल करता येणार आहे. चुकीच्या नोंदी असल्यास हरकतही नोंदवता येईल.

Maharashtra SIR | Sarkarnama

‘ही’ गोष्ट 24 तासांत करा

24 ऑगस्टला यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर आपलं नाव तपासा. नाव नसेल तर दावा दाखल करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने सुरू करा.

Maharashtra SIR | Sarkarnama

दावे-हरकतींची होणार छाननी

मतदारांकडून दाखल करण्यात आलेले दावे आणि हरकती निवडणूक यंत्रणेकडून तपासले जातील. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Maharashtra SIR | Sarkarnama

अंतिम यादी कधी?

सर्व हरकतींच्या प्रक्रियेनंतर 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

Maharashtra SIR | Sarkarnama

मतदारांनी काय लक्षात ठेवायचं?

प्रारूप यादीत नाव नसणं म्हणजे संधी संपली असं नाही. तर 24 ऑगस्टनंतर नाव तपासा आणि नाव नसल्यास 23 सप्टेंबरपूर्वी दावा दाखल करण्याची संधी नक्की वापरा.

Maharashtra SIR | Sarkarnama

Next : एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी! E KYC ची मुदत वाढली; मोबाईलवरून 'असे' करा ऑनलाइन अपडेट!

येथे क्लिक करा