IAS Smita Sabharwal : वयाच्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी ; UPSC परीक्षेतील रँक ऐकून व्हाल थक्क

Rashmi Mane

'जनता अधिकारी'

स्मिता सभरवाल यांना 'जनता अधिकारी' म्हणूनही ओळखले जाते.

IAS Smita Sabharwal | Sarkarnama

पुरस्काराने सन्मानित

'आयएएस' अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

IAS Smita Sabharwal | Sarkarnama

तरूणांसाठी प्रेरणास्थान

सभरवाल या देशभरातील 'आयएएस' इच्छुकांसाठी प्रेरणा बनल्या आहेत.

IAS Smita Sabharwal | Sarkarnama

'आयएएस टॉपर'

२००० च्या 'यूपीएससी' परीक्षेत 'चौथी रँक' मिळवून त्या 'आयएएस' टॉपर बनल्या होत्या.

IAS Smita Sabharwal | Sarkarnama

शिक्षण

स्मिता या मूळच्या दार्जिलिंगच्या आहेत. स्मिता यांनी नववीपर्यंतचे शिक्षण हैदराबादमध्ये घेतले त्यानंतर सेंट अॅन्स, मरेडपल्ली, हैदराबाद येथून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. 

IAS Smita Sabharwal | Sarkarnama

वाणिज्य शास्त्रात पदवी

'आयसीएसई' बोर्डातून बारावीमध्ये 'ऑल इंडिया लेवलवर फर्स्ट रॅंक' मिळवला होता. त्यानंतर त्यांनी सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेज फॉर वुमनमधून बी.कॉम केले.

IAS Smita Sabharwal | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयशी

ग्रॅज्युएशननंतर स्मिता सभरवाल यांनी 'सिव्हिल सर्व्हिस' परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, स्मिता पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी ठरल्या आणि प्रिलिम परीक्षाही पास करू शकल्या नाही.

IAS Smita Sabharwal | Sarkarnama

22 व्या वर्षी IAS अधिकारी

पहिल्याच प्रयत्नात अपयश झाल्यानंतरही स्मिता सभरवाल यांनी हार न मानता दुसऱ्यांदा मेहनत घेऊन परीक्षा दिली. स्मिता यांनी 2000 साली UPSC परीक्षेत चौथा क्रमांक मिळवला आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्या IAS अधिकारी बनल्या.

IAS Smita Sabharwal | Sarkarnama

Next : सहा महिन्यात अँटी करप्शनच्या 60 कारवाया; 'एसीपी' शर्मिष्ठा वालावलकरांची धडाकेबाज कामगिरी